नुकतेच प्रख्यात न्यूरोसर्जन आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अशोक कुमार महापात्रा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • डॉ. अशोक कुमार महापात्रा यांचे नवी दिल्ली निधन झाले आहे.
  • २९ डिसेंबर १९५२ रोजी ओडिशामधील पुरी येथे त्यांचा जन्म झाला होता.

डॉ. अशोक कुमार महापात्रा यांच्याबद्दल:

भूषविलेली पदे / भूमिका:

  • न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख - 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (All India Institute of Medical Sciences - AIIMS)', नवी दिल्ली
  • संस्थापक संचालक (२०१२–२०१६) - AIIMS, भुवनेश्वर, ओडिशा
  • संचालक (२००६–२००९) - 'संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस', लखनौ (उत्तर प्रदेश)
  • कुलगुरू (२०२०–२०२२) - 'शिक्षा 'ओ' अनुसंधान' विद्यापीठ, भुवनेश्वर (ओडिशा)

उल्लेखनीय कार्य:

  • नवी दिल्ली येथील एम्समध्ये एका बहुविद्याशाखीय पथकाचे २०१७ मध्ये त्यांनी नेतृत्व केले होते. 
  • त्यांनी ओडिशामधील 'क्रेनियोपॅगस' (डोक्याने जोडलेले) जुळे भाऊ, जगा आणि बालिया, यांना या ऐतिहासिक स्वरूपाच्या १६ तासांच्या शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे वेगळे केले होते. 
  • ही शस्त्रक्रिया भारतातील अशा प्रकारची पहिलीच घटना होती तसेच दोन्ही मुले या शस्त्रक्रियेनंतर जिवंत राहिली होती.

प्राप्त सन्मान/ पुरस्कार:

  • 'सी. व्ही. रामन ॲवॉर्ड फॉर सायंटिफिक एक्सलन्स' (२०२२) - वैज्ञानिक संशोधनातील उत्कृष्ट योगदान आणि वैद्यकीय क्षेत्रातील नैपुण्याबद्दल
  • पद्मश्री पुरस्कार - २०२५ - वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल