महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच लंडन (युनायटेड किंगडम) येथे 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन (Commonwealth Public Leadership Recognition)', 'स्टेट्समनशिप अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप (Statesmanship Award for Transformative Leadership)' आणि 'ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड (Global Pride of Maharashtra Award)' या ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
- जन-केंद्रित, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनाची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना राबवलेल्या कामांसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
- लंडन (युनायटेड किंगडम) येथील ९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत (३ दिवसांचा अधिकृत दौरा) त्यांना ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कारांविषयी महत्वाची माहिती:
प्रथम पुरस्कार: कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन (Commonwealth Public Leadership Recognition):
- 'हाऊस ऑफ लॉर्ड्स (House of Lords)'मध्ये 'यूके आशियान बिझनेस कौन्सिल (UK Asian Business Council)' आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस (Canvas for Care Creative Art Campus)' यांच्या सहयोगाने सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- एकनाथ शिंदे यांच्या नागरिक-केंद्रित, पारदर्शक तसेच नाविन्यपूर्ण प्रशासनाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
द्वितीय पुरस्कार: स्टेट्समनशिप अवॉर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप (Statesmanship Award for Transformative Leadership):
- 'हाऊस ऑफ कॉमन्स (House of Commons)'मध्ये 'वर्ल्ड लीडरशिप फोरम (World Leadership Forum)' आणि 'इंडो-युरोपियन बिझनेस फोरम (Indo-European Business Forum)' यांच्या वतीने सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- परिवर्तनशील प्रशासन, पायाभूत सुविधा विकास तसेच प्रादेशिक विकास यांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्याना प्रदान करण्यात आला आहे.
तृतीय पुरस्कार: ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड (Global Pride of Maharashtra Award):
- 'महाराष्ट्र मंडळ'तर्फे लंडन (युनायटेड किंगडम) येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार केल्याबद्दल त्यांचा हा उचित सन्मान करण्यात आला आहे.