नुकतीच चेन्नईतील चेपॉक येथील अंतिम सामन्यात 'ईस्ट झोन'ने (East Zone) २०२६-२७ ची दुलीप ट्रॉफी जिंकली आहे.
ठळक मुद्दे:
- सामना अनिर्णित राहिल्यामुळे यंदाची ट्रॉफी 'ईस्ट झोन'ने जिंकली आहे.
- 'ईस्ट झोन'ने ७०८ धावांचा डोंगर उभारत 'साउथ झोन'ला ३३६ धावांत बाद करून मोठी आघाडी मिळवून 'ईस्ट झोन'ने ही ट्रॉफी जिंकली आहे.
- त्यानंतर ७ बाद ३८८ धावांवर डाव घोषित केल्यामुळे 'साउथ झोन'साठी सामन्याचा निकाल फिरवणे अशक्यप्राय झाले.
- या सामन्यात २७० आणि ८० धावा बनवल्याने इशान किशनला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.
विजेते यादी (विजेता-उपविजेता-हंगाम):
- ईस्ट झोन - साउथ झोन (२०२६-२७)
- सेंट्रल झोन - साउथ झोन (२०२५–२६)
- इंडिया ए - इंडिया सी (२०२४–२५)
- साउथ झोन - वेस्ट झोन (२०२३)
- वेस्ट झोन - साउथ झोन (२०२२–२३)
- इंडिया रेड - इंडिया ग्रीन (२०१९–२०)
दुलीप ट्रॉफीबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ही भारतातील महत्वपूर्ण देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे.
- १९६१-६२ च्या हंगामात ही क्रिकेट स्पर्धा BCCI ने सुरू केली होती.
- श्री दुलीपसिंहजी (नवानगरचे कुमार) या सुरुवातीच्या काळातील भारतीय क्रिकेटपटूच्या नावावरून या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले होते.
- भारताच्या विविध विभागांचे (zones) संघ या स्पर्धेत असतात जसे की - उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य.