'कोरड्या प्रदेशांबाबतचा दिल्ली जाहीरनामा (Delhi Declaration on Drylands)' स्वीकारून नवी दिल्ली येथे नुकतीच 'ड्रायलँड काँग्रेस (Dryland Congress) २०२६' ची सांगता झाली आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथे नुकतीच ३ दिवसीय 'ड्रायलँड काँग्रेस २०२६' ची सांगता झाली आहे.
- सदर परिषदेच्या अंतिम दिवशी 'कोरड्या प्रदेशांबाबतचा दिल्ली जाहीरनामा (Delhi Declaration on Drylands)' स्वीकारण्यात आला आहे.
- सदर जाहीरनाम्याच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीसाठी सदृढ उपाययोजना आखण्यासाठी 'दक्षिण-दक्षिण' तसेच 'त्रिकोणीय सहकार्य' बळकट करण्याचे आवाहन करत सहयोगात्मक दृष्टिकोनांवर भर देण्यात आला आहे.
- संकल्पना/ थीम (Theme): 'दक्षिण-दक्षिण सहकार्याद्वारे कोरडवाहू शेतीत परिवर्तन (Transforming Dryland Agriculture with South-South Cooperation)' ही या परिषदेची संकल्पना होती.
'ड्रायलँड काँग्रेस २०२६' बाबत महत्वाची माहिती:
- 'भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research - ICAR)' आणि 'अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय क्षेत्रांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics - ICRISAT)' यांच्या सहयोगातून सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
- ICAR चे उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. डी.के. यादव आणि ICRISAT चे उपमहासंचालक (संशोधन आणि नवोपक्रम) डॉ. स्टॅनफोर्ड ब्लेड यांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले.
ISSCA ग्लोबल अवॉर्ड्स २०२६ बाबत महत्वपूर्ण माहिती:
- सदर परिषदेदरम्यान 'शेती क्षेत्रातील दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय एकता' (International Solidarity for South-South Cooperation in Agriculture - ISSCA) जागतिक पुरस्कार २०२६ चे अनावरण करण्यात येऊन पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
- सदर पुरस्कारांसाठी जगभरातून जवळपास ३४ देशांतून साधारणतः १७० नामांकने प्राप्त झाली होती.