डॉ. विनय प्रकाश सिंह यांची 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (Asian-Pacific Postal Union - APPU)' सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (APPU)' सरचिटणीसपदी डॉ. विनय प्रकाश सिंह यांची सलग दुसऱ्या ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.
- ते भारतीय टपाल सेवेतील १९८८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
- ४ सप्टेंबर २०२६ रोजी बँकॉक, थायलंड येथे झालेल्या १४ व्या APPU काँग्रेसमध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
- जानेवारी २०२७ ते डिसेंबर २०३० या कालावधीसाठी त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असेल.
डॉ. विनय प्रकाश सिंह यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
कारकिर्दीत भूषविलेली पदे:
- सदस्य - टपाल सेवा मंडळ
- वरिष्ठ उप-महासंचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी - टपाल विभाग
- मुख्य पोस्टमास्टर जनरल - उत्तर प्रदेश सर्कल
- मुख्य महाव्यवस्थापक - भारतीय पोस्ट मुख्यालय
इतर उल्लेखनीय कार्ये:
- अफगाणिस्तानमधील 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP)'
- 'केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC)' आणि सेना टपाल सेवा दल (Army Postal Service Corps) यांच्यासोबत काम
प्रथम कार्यकाळ:
- २०२२ मध्ये मधील १३ व्या APPU काँग्रेसमध्ये निवड झाल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा APPU चे सरचिटणीस म्हणून पदभार