व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या स्पर्धेत डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोलाने 'मिस वर्ल्ड (Miss World) २०२६' चा किताब जिंकला आहे.
ठळक मुद्दे:
- व्हिएतनाममधील न्हा ट्रांग (Nha Trang) येथे 'मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनमार्फत (Miss World Organization - MWO)' आयोजित ७३ व्या स्पर्धेत डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोलाला 'मिस वर्ल्ड २०२६' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- जगभरातून १११ स्पर्धकांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
- या उल्लेखनीय कामगिरीनंतर मारियासेला अल्वारेझ (१९८२) यांच्यानंतर 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकणारी ती डोमिनिकन रिपब्लिकची केवळ दुसरी महिला ठरली आहे.
'मिस वर्ल्ड २०२६' बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पुरस्कार प्रदान: थायलंडच्या 'मिस वर्ल्ड २०२५' ओपल सुचाता चुआंगसरी यांनी डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोला हीस 'मिस वर्ल्ड २०२६'चा मुकुट परिधान केला.
- प्रथम उपविजेती (First runner-up): एलिझाबेथ रेनेस अलाबेर्न (स्पेन)
- द्वितीय उपविजेती (Second runner-up): तानुसिया चेट्टी (मलेशिया)
- भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निकिता पोरवाल (उज्जैन, मध्य प्रदेश) यांनी 'टॉप ४०' मध्ये स्थान मिळवले होते.
- स्पर्धेचे पुढील यजमान: २०२७ मधील पुढील स्पर्धा ही 'जागतिक यजमानपद फिरते ठेवण्याच्या धोरणाअंतर्गत' टांझानियामध्ये आयोजितकरण्यात येणार आहे.