भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत दूरसंचार विभागामार्फत (Department of Telecommunications - DoT) पुणे, महाराष्ट्र येथे 'ब्रिक्स आयसीटी (Information and Communication Technologies  - ICT) ट्रॅक'चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे:

  • १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुणे, महाराष्ट्र येथे संचार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दूरसंचार विभागामार्फत (DoT) या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
  • 'भक्कम भविष्यासाठी नावीन्य, सहकार्य आणि परिवर्तन (Innovate, Cooperate, and Transform for a Resilient Future)' या संकल्पनेवर हे सत्र आधारित होते.
  • ICT क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे आणि सुरक्षित, सर्वसमावेशक व लवचिक डिजिटल भविष्याला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

BRICS बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full-form): BRICS हे नाव Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
  • वैशिष्ट्य: ही जगातील प्रगतशील तसेच वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश असणारी एक प्रसिद्ध आणि तितकीच अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
  • स्थापना वर्ष: १६ जून २००९ रोजी BRICS ची स्थापना करण्यात आली होती.
  • दक्षिण आफ्रिकेचा समावेश: सुरुवातीला Brazil, Russia, India आणि China इतकेच देश असल्याने BRIC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात २०१० साली South Africa समाविष्ट झाला आणि याचे नाव BRICS असे पडले.
  • स्थापनेमागची संकल्पना: Goldman Sachs चे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असणाऱ्या जिम ओ'नील यांच्या डोक्यातून या संघटनेची स्थापना करण्याची संकल्पना आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: ब्रिक्सचे (BRICS) कोणतेही एक कायमस्वरूपी मुख्यालय नाही. BRICS ची मुख्य वित्तीय संस्था असणाऱ्या 'न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (New Development Bank)' कायमस्वरूपी मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.