नुकताच दिनेश विठ्ठलराव गनवीर यांनी 'भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (Geological Survey of India - GSI)' ५५ व्या 'महासंचालक (Director General - DG)' पदाचा पदभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे:
- खाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणा'चे ५५ वे महासंचालक म्हणून सुप्रसिद्ध भूवैज्ञानिक दिनेश विठ्ठलराव गनवीर यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.
- GSI च्या ५४ व्या आणि पहिल्या महिला महासंचालक असणाऱ्या वर्षा अशोक अगळवे यांच्याकडून त्यांनी हा कार्यभार स्वीकारला आहेत.
दिनेश गनवीर यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- गनवीर यांना वैज्ञानिक, तांत्रिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील ३२ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
- यामध्ये भूवैज्ञानिक तपासणी, खनिज शोध तसेच अभियांत्रिकी भूविज्ञान यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
- GSI चे महासंचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, गनवीर हे नागपूर, महाराष्ट्र (मध्य विभाग) येथे अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.
- यासोबतच त्यांच्याकडे 'नॅशनल मिशन हेड-II' चा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता.