नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. दिनेश शर्मा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामार्फत अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे.
  • ॲडमिरल (निवृत्त) देवेंद्र कुमार जोशी यांची ते जागा घेतील.
  • देवेंद्र कुमार जोशी हे २०१७ पासून अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी नौदल प्रमुख पदक कार्यभार सांभाळला होता.

डॉ. दिनेश शर्मा यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • उत्तर प्रदेशातून राज्यसभा खासदार म्हणून २०२३ पासून ते कार्यरत होते.
  • राज्यसभेच्या उप-सभापतींच्या पॅनेलचे ते सदस्यही होते.
  • घटनात्मक बाब: भारतीय संविधान कलम २३९ नुसार, नायब राज्यपाल हे काही केंद्रशासित प्रदेशांचे घटनात्मक प्रमुख असतात आणि या प्रदेशांमध्ये ते भारताच्या राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात.