'स्वतःचा महसुलाचा वाटा (Own Revenue Share)' बाबतीत ९३.२% महसूल प्रमाणासह दिल्ली राज्यांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.
ठळक मुद्दे:
- आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार उपलब्ध आकडेवारीनुसार भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीने स्वतःच्या महसुलाचा ९३.२% इतका सर्वाधिक वाटा नोंदवला आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 'भारतीय राज्यांवरील सांख्यिकी पुस्तिका (Handbook of Statistics on Indian States) २०२५' मधील माहितीचा वापर करताना 'बिझनेस स्टँडर्ड (Business Standard)'च्या 'भारतातील राज्यांच्या वित्तीय स्थितीचा मागोवाद्वारे (India State Fiscal Health Tracker)' हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
- या यादीत १० टक्के महसूल प्रमाणासह मणिपूर तळाच्या स्थानावर आहे.
अव्वल ५ राज्ये/केंद्रशासित प्रदेश व टक्केवारी:
- १. दिल्ली (९३.२%)
- २. हरियाणा (८०.४%)
- ३. तेलंगणा (७८.४%)
- ४. कर्नाटक (७७.३%)
- ५. तामिळनाडू (७५.५%)
तळाची ५ राज्ये/केंद्रशासित प्रदेश व टक्केवारी:
- ३१. मणिपूर (१०%)
- ३०. नागालँड (१२.५%)
- २९. अरुणाचल प्रदेश (१२.८%)
- २८. त्रिपुरा (१६.६%)
- २७. मिझोराम (१९.६%)