संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO द्वारे नुकतीच लडाखमध्ये स्वदेशी MCPS (Military Combat Parachute System) पॅराशूट प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) लेह, लडाख येथील 'न्योमा-मुध ड्रॉप झोन'वर 'मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टम' (MCPS) या स्वदेशी उंच ठिकाणाहून वापरल्या जाणाऱ्या (High-altitude) पॅराशूटची यशस्वी चाचणी केली. 
  • यामध्ये विशेष मोहिमांच्या क्षमतेसाठी समुद्रसपाटीपासून २२,००० फूट उंचीवरून आणि उणे १५ अंश सेल्सिअस (-१५°C) तापमानात सुरक्षित उड्या मारण्याचे प्रात्यक्षिक यात सादर करण्यात आले.
  • आग्रा, उत्तर प्रदेश येथील 'हवाई वितरण संशोधन आणि विकास संस्थेने (Aerial Delivery Research and Development Establishment - ADRDE)' याची रचना केली आहे. 
  • बेंगळुरू, कर्नाटक येथील 'संरक्षण जैव-अभियांत्रिकी आणि वैद्यकीय-विद्युत प्रयोग शाळेमार्फत (Defence Bioengineering and Electromedical Laboratory - DEBEL)' यामधील जीवन-रक्षक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
  • खाली उतरण्याचा वेग कमी असणे तसेच सुधारित दिशा-नियंत्रण यांसारखी वैशिष्ट्ये MCPS मध्ये आहेत.
  • 'हाय-अल्टिट्यूड लो ओपनिंग' (HALO) आणि 'हाय-अल्टिट्यूड हाय ओपनिंग' (HAHO) अशा दोन्ही प्रकारच्या मोहिमांसाठी सदर प्रणाली उपयुक्त आहे.

DRDO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): DRDO म्हणजेच 'Defence Research and Development Organisation' अर्थात 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' होय.
  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९५८ रोजी DRDO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या राजेश कुमार सिंग हे DRDO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
  • बोधवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in science - सामर्थ्याचा उगम विज्ञानात आहे)' हे या संस्थेचे बोधवाक्य आहे.