संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO कडून नुकताच मायक्रोवेव्ह संरक्षण चाचणीसाठी ‘SHIELD’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • DRDO ने 'डायरेक्टेड-एनर्जी' (Directed-energy)' तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रात स्वदेशी क्षमता बळकट करण्यासाठी ‘SHIELD’ कार्यक्रम अधिकृतपणे सुरू केला आहे.
  • कार्यक्रमाचे पूर्ण नाव: SHIELD म्हणजेच 'S-band High-Power Microwave Integrated Evaluation for Lethality and Damage' अर्थात 'घातकता आणि नुकसानीच्या मूल्यांकनासाठी एस-बँड हाय-पॉवर मायक्रोवेव्ह एकात्मिक प्रणाली' असे आहे.

SHIELD कार्यक्रमाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • सदर उपक्रम हा DRDO च्या 'तंत्रज्ञान विकास निधी' (Technology Development Fund - TDF) अंतर्गत राबविला जात आहे.
  • उद्योगांच्या नेतृत्वाखालील संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे तसेच आत्मनिर्भरता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

DRDO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): DRDO म्हणजेच 'Defence Research and Development Organisation' अर्थात 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' होय.
  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९५८ रोजी DRDO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या राजेश कुमार सिंग हे DRDO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
  • बोधवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in science - सामर्थ्याचा उगम विज्ञानात आहे)' हे या संस्थेचे बोधवाक्य आहे.