नुकताच 'आर्थिक सेवा विभागाला (Department of Financial Services)' अधिकृत भाषा असलेल्या हिंदीची उत्कृष्ट अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण वापरासाठी २०२५-२६ सालचा पहिला 'राजभाषा कीर्ती पुरस्कार (Rajbhasha Kirti Prize)' प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्दे:
- ३०० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभाग श्रेणीमध्ये सदर पुरस्कार देण्यात आला आहे.
- सदर पुरस्कार हा गृह मंत्रालयाच्या 'अधिकृत भाषा विभागा'द्वारे आयोजित '६ व्या अखिल भारतीय अधिकृत भाषा परिषदे'त आणि 'हिंदी दिवस' समारंभात प्रदान करण्यात आला आहे.
- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली १४-१५ सप्टेंबर २०२६ रोजी वाशी, नवी मुंबई येथे ही २ दिवसीय परिषद पार पडली आहे.
- हिंदी भाषेचा अधिकृत कामकाजात जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देणे तसेच या भाषेच्या वापरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे यांसाठी या विभागाला विशेषतः हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- आर्थिक सेवा विभागाच्या वतीने अतिरिक्त सचिव हरी हर मिश्रा यांनी अमित शाह यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
'राजभाषा कीर्ती पुरस्कार' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- गृह मंत्रालयाच्या 'अधिकृत भाषा विभागा'द्वारे हा पुरस्कार देण्यात येतो.
- अधिकृत कामकाजामध्ये हिंदी भाषेच्या अंमलबजावणी तसेच प्रसारासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या विभागांना हे 'राजभाषा कीर्ती पुरस्कार' प्रदान करण्यात येतात.