राजभाषा विभागामार्फत (Department of Official Language - DOL) 'प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाची (Department of Administrative Reforms and Public Grievances - DARPG)' विशेष 'राजभाषा उत्कृष्टता सन्मान (Rajbhasha Utkrishtta Sammaan)' २०२५-२६ साठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • गृह मंत्रालयांतर्गत असणाऱ्या 'राजभाषा विभागाद्वारे' नवी दिल्ली येथील 'प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाची' अधिकृत भाषेच्या म्हणजेच राजभाषेच्या अंमलबजावणीतील उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत २०२५-२६ या वर्षासाठी विशेष 'राजभाषा उत्कृष्टता सन्मान' साठी निवड करण्यात आली आहे.
  • १४ सप्टेंबर २०२६ रोजी 'हिंदी दिवसानिमित्त' नवी मुंबई, महाराष्ट्र येथे आयोजित 'हिंदी दिवस संमेलन' दरम्यान हा विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

'राजभाषा उत्कृष्टता सन्मान' बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • DARPG ने २०२५-२६ मध्ये अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा प्रसार आणि अंमलबजावणी कामगिरीसाठी ३०० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभाग या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • DARPG ने २०२३-२४ आणि २०२४-२५ या सलग २ वर्षात 'राजभाषा कीर्ती पुरस्कार' जिंकला होता.