नुकत्याच जाहीर कण्यात आलेल्या कॉम्पेटिअर फाउंडेशन अहवालानुसार (Competere Foundation’s Report) 'जागतिक स्पर्धात्मकता सुधारणा क्रमवारीत (Global Competitiveness Reforms Ranking)' भारत ५७ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • 'कॉम्पेटिअर फाउंडेशन' या स्वतंत्र धोरण आणि वकिली गटाने नुकताच आपला नवीनतम अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • या अहवालाचे शीर्षक 'भारताची पुढील विकासाची सीमा: २०१०-२०२३ मधील सुधारणांच्या प्रगतीवर आधारित स्पर्धा-विरोधी बाजारपेठेतील विसंगती कमी करणे (India’s Next Growth Frontier: Reducing Anti-Competitive Market Distortions to Build on India’s 2010–2023 Reform Progress - ACMDs)' असे आहे.
  • सदर अहवालानुसार सध्याच्या घडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा संरचनात्मक सुधारणा करणारा एक सर्वात प्रभावी देश म्हणून उदयास आला आहे.
  • भारताने आपल्या जागतिक क्रमवारीत २५ स्थानांची सुधारणा करत २०१० मधील ८२ व्या स्थानावरून २०२३ मध्ये ५७ व्या स्थानावर मजल मारली आहे.
  • २०१० ते २०२३ या कालावधीतील देशाच्या संरचनात्मक आणि स्पर्धा-पूरक सुधारणांचा मागोवा घेणे हा या अहवालाचा मुख्य उद्देश आहे.
  • फाउंडेशनच्या 'बाजार विरूपण कामगिरी निर्देशांकाद्वारे (Market Distortions Performance Index - MDPI)' देशांच्या कामगिरीचे मूल्यांकन मालमत्तेच्या अधिकारांचे संरक्षण, देशांतर्गत स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा या ३ मुख्य निकषांवर केले जाते.