नुकतीच कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे:

  • १५ वर्षांची कारकीर्द गाजवल्यानंतर ३५ वर्षीय कोलंबियन फुटबॉलपटू जेम्स रॉड्रिग्जने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • २०२६ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने ही निवृत्ती जाहीर केली आहे.
  • रॉड्रिग्जने आपल्या कारकिर्दीत १३१ सामने खेळताना ३१ गोल ​​केले होते.

जेम्स रॉड्रिग्जबाबत महत्वाची माहिती:

  • २०११ मध्ये बोलिव्हियाविरुद्ध कोलंबियासाठी त्याने पदार्पण केले होते.
  • २०१४ च्या फिफा विश्वचषकातील दिमाखदार प्रदर्शनानंतर त्याला खरी जागतिक प्रसिद्धी मिळाली होती.
  • त्याने या स्पर्धेत ६ गोल करून 'गोल्डन बूट' जिंकतानाचकोलंबियाला पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेन्यात मोलाची कामगिरी पार पाडली.
  • त्याने उरुग्वेविरुद्ध केलेल्या गोलसाठी 'फिफा पुस्कास पुरस्कार' (FIFA Puskás Award) पटकावला होता.
  • रॉड्रिग्जने आपल्या कारकिर्दीत २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
  • 'कोपा अमेरिका' स्पर्धांमध्येही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.