नुकतेच युनायटेड किंगडम (UK) स्थित कॉलिन्स डिक्शनरीमार्फत ‘मॉगिंग (Mogging)' या शब्दाला २०२६ 'वर्षातील सर्वोत्तम शब्द (Word of the Year)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- विशेषतः 'जनरेशन झेड (Gen Z)' आणि 'जनरेशन अल्फा (Gen Alpha)' पिढीमध्ये प्रामुख्याने सोशल मीडियावर हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे.
- ‘मॉगिंग’ हा शब्द ‘AMOG’ (Alpha Male of the Group - गटातील प्रभावी पुरुष) यावरून आला आहे.
- या शब्दाचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने आपल्या दिसण्याने, आत्मविश्वासाने, सामाजिक दर्जाद्वारे किंवा यशाच्या जोरावर इतरांपेक्षा अधिक प्रभावी किंवा सरस ठरणे.
- याचा उगम म्हणजे २०१६ च्या सुमारास बॉडीबिल्डिंग समुदायांमध्ये हा शब्द वापरात आला होता.
- कॉलिन्स डिक्शनरीने २०२५ वर्षासाठी ‘व्हायब कोडिंग (Vibe Coding)' हा शब्द निवडला होता. याचा अर्थ नैसर्गिक भाषेतील सूचनांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) संगणक कोड तयार करणे असा होतो.