नुकतीच कोचीन शिपयार्ड लिमिटेडमार्फत भारतीय नौदलाकडे 'आयएनएस मंगरोल' (INS Mangrol) ही तिसरी 'उथळ पाण्यातील पाणबुडी-विरोधी युद्धनौका (ASW-SWC)' सुपूर्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • कोचीन शिपयार्ड लिमिटेडने (Cochin Shipyard Limited - CSL) भारतीय नौदलाकडे (Indian Navy - IN) आपल्या केरळ मधील कोची येथील केंद्रात 'आयएनएस मंगरोल' (INS Mangrol) ही नौका यशस्वीरीत्या सुपूर्द केली आहे.
  • स्वदेशी बनावटीच्या ८ 'उथळ पाण्यातील पाणबुडी-विरोधी युद्धनौकांपैकी (Anti-Submarine Warfare Shallow-Water Crafts - ASW-SWCs)' ही तिसरी नौका आहे.
  • सदर हस्तांतरण प्रक्रियेच्या करारावर कोचीन शिपयार्डचे संचालक डॉ. हरिकृष्णन एस. आणि नियुक्त कमांडिंग ऑफिसर कमांडर यू. शरण कुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

'आयएनएस मंगरोल (INS Mangrol)' बद्दल महत्वाची माहिती:

  • गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील 'मंगरोल' या ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या किनारी शहरावरून या नौकेचे नाव ठेवण्यात आले आहे.
  • कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे ही नौका स्वदेशी तंत्रज्ञानाने डिझाइन आणि तयार करण्यात आली असून तिची निर्मिती 'डेट नॉर्स्के व्हेरिटासच्या (Det Norske Veritas - DNV)' वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे.
  • डिझेल इंजिन-वॉटरजेट प्रोपल्शन प्रणालीवर चालणाऱ्या या नवीन नौकेमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्या असून यामध्ये स्वदेशी ASW रॉकेट्स आणि प्रगत 'शॅलो-वॉटर सोनार' (shallow-water SONARs) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
  • जवळपास ८०% स्वदेशी घटकांचा वापर या नौकेमध्ये करण्यात आला आहे.
  • भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat)' उपक्रमाला बळ देणाऱ्या स्वदेशी युद्धनौका निर्मितीमधील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.