नुकतेच कॅनेडियन कवयित्री ॲन कार्सन यांना त्यांच्या धाडसी आणि नाविन्यपूर्ण साहित्यकृतींसाठी 'साहित्यातील २०२६ चे नोबेल पारितोषिक (Nobel Prize in Literature’ for Her Bold and Inventive Literary Works)' जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- स्वीडिश अकादमीमार्फत कॅनेडियन कवयित्री आणि निबंधकार ॲन कार्सन यांना 'साहित्यातील २०२६ चे नोबेल पारितोषिक' जाहीर केले आहे.
- समकालीन साहित्यासाठी नवनवीन प्रकार निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी तसेच नाविन्यपूर्ण साहित्यकृतींसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
- या पारितोषिकाबद्दल त्यांना एकूण १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर इतकी पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे.
- १९०१ सालापासून साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या त्या १९ व्या महिला ठरल्या आहेत.
- २०१३ साली ॲलिस मन्रो यांनी पुरस्कार जिंकल्यानंतर अशा प्रकारचा सन्मान मिळवणाऱ्या दुसऱ्या कॅनेडियन महिला बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे.