कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence - AI) वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर केंब्रिज डिक्शनरीमार्फत ‘ह्युमन (Human)’ या शब्दाला २०२६ चा ‘वर्ड ऑफ द इयर (Word of the Year)’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- ‘ह्युमन’ या शब्दाची निवड मुख्यत्वे वाढत्या AI प्रभावाच्या पार्श्वभूमीवर मानवी सर्जनशीलता तसेच नातेसंबंध याबाबत नव्याने निर्माण झालेल्या कौतुकावर प्रकाश टाकण्याचे कार्य करते.
- सदर निवड ही मानवाने तयार केलेली सामग्री तसेच AI ने तयार केलेली सामग्री यांमधील फरक ओळखण्याचे वाढते महत्त्व दर्शवते ज्याला ‘ह्युमन प्रीमियम (Human Premium)’ असे म्हटले जाते.
- शब्दाची व्याख्या: केंब्रिज डिक्शनरीनुसार ‘ह्युमन’ = प्राणी, यंत्रे किंवा देव यांच्याऐवजी लोकांशी संबंधित
- शब्दाचा उगम: हा शब्द लॅटिन संज्ञा ‘ह्युमनस’ (humanus) पासून आला आहे आणि १५ व्या शतकापासून इंग्रजीमध्ये वापरला जात आहे.
शॉर्टलिस्ट झालेले इतर शब्द:
- १. ॲनालॉग (Analogue)
- २. एजंट (Agent)
- ३. व्होलसम (Wholesome)
- ४. चिक (Chic)