नुकतीच समुद्रातील तेल आणि वायू शोधकार्याला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ८४,०८४ कोटी रुपयांच्या ‘समुद्र मंथन’ योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ‘समुद्र मंथन’ - राष्ट्रीय ऑफशोर शोधकार्य (National Offshore Exploration - NOE) योजनेस मंजुरी दिली आहे.
- समुद्रातील तेल आणि वायू शोधकार्याला चालना देणे, भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे, आयतीत ऊर्जेवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे आणि ऊर्जा क्षेत्रातील उत्पादनपूर्व टप्प्यावर तांत्रिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे हा सदर योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- भारत सरकारच्या माहितीनुसार, नव्याने मंजूर झालेली ही योजना आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत राबवण्यात येणार आहे.