कॅबिनेटमार्फत 'अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate - ED)' संचालक राहुल नवीन यांच्या कार्यकाळात एक वर्षाची मुदतवाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 'कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (Appointments Committee of the Cabinet - ACC)' अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) संचालक राहुल नवीन यांना १ वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे.
  • आता त्यांचा कार्यकाळ १३ ऑगस्ट २०२७ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आला आहे.

राहुल नवीन यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाचे:

  • ते १९९३ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (Indian Revenue Service IRS) अधिकारी आहेत.
  • त्यांना ED मध्ये काम करण्याचा मोठा अनुभव असून, त्यांनी तेथे अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
  • संस्थेने हाती घेतलेल्या प्रमुख तपासांमध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.
  • १४ ऑगस्ट २०२४ रोजी संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची ED चे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ED बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ED म्हणजेच Enforcement Directorate अर्थात अंमलबजावणी संचालनालय होय.
  • स्थापना वर्ष:  १ मे १९५६ रोजी ICAO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ED चे मुख्यालय स्थित आहे.
  • जबाबदार मंत्रालय: ED संस्था वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. 
  • कार्य: मनी लाँड्रिंग प्रकरणांचा तसेच परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांचा तपास आणि खटला चालवण्याचे कार्य ED करते.