भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India - CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामार्फत नुकतेच बिहारमधील पाटणा येथे भारतातील पहिल्या पीडित हक्क केंद्राचे (Victim Rights Centre) उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- पीडितांना हक्क, वैद्यकीय, मानसिक तसेच सामाजिक सहाय्यासाठी एकात्मिक कायदेशीर मदत करणे या मुख्य उद्देशासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
- CJI सूर्यकांत यांनी बिहारमधील पाटणा येथील बिहार राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात या भारतातील पहिल्या पीडित हक्क केंद्राचे उद्घाटन केले आहे.
पीडित हक्क केंद्राबाबत महत्वपूर्ण माहिती:
केंद्रात उपलब्ध सुविधा:
- पीडितांच्या प्रकरणांची नोंद ठेवणे
- एक-खिडकी सहाय्य यंत्रणा प्रदान करणे
- निश्चित कालमर्यादेद्वारे उत्तरदायित्व सुनिश्चित करणे
केंद्राचे लाभार्थी:
- वृद्ध पीडित
- लैंगिक गुन्ह्यांतून वाचलेले
- संवेदनशील प्रकरणांमधील साक्षीदार