नुकतेच भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे (Competition Commission of India - CCI) राजस्थानमधील उदयपूर येथे ब्रिक्स (BRICS) स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे:
- भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे (CCI) राजस्थानमधील उदयपूर येथे ब्रिक्स (BRICS) स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
- निष्पक्ष स्पर्धा आणि स्पर्धा कायद्याशी संबंधित उदयोन्मुख आव्हाने व धोरणांबाबत सहकार्य अधिक दृढ करणे हा सदर बैठकीचा मुख्य उद्देश होता.
CCI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): CCI म्हणजेच Competition Commission of India अर्थात भारतीय स्पर्धा आयोग होय.
- स्थापना वर्ष: १४ ऑक्टोबर २००३ रोजी CCI ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे CCI चे मुख्यालय स्थित आहे.
- स्थापना संबंधित कायदा: स्पर्धा कायदा, २००२ (पूर्वीच्या Monopolies and Restrictive Trade Practices Act - MRTP कायदा, १९६९ च्या जागी) नुसार CCI ची स्थापना करण्यात आली होती.
BRICS बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-form): BRICS हे नाव Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
- वैशिष्ट्य: ही जगातील प्रगतशील तसेच वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश असणारी एक प्रसिद्ध आणि तितकीच अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- स्थापना वर्ष: १६ जून २००९ रोजी BRICS ची स्थापना करण्यात आली होती.
- दक्षिण आफ्रिकेचा समावेश: सुरुवातीला Brazil, Russia, India आणि China इतकेच देश असल्याने BRIC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात २०१० साली South Africa समाविष्ट झाला आणि याचे नाव BRICS असे पडले.
- स्थापनेमागची संकल्पना: Goldman Sachs चे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असणाऱ्या जिम ओ'नील यांच्या डोक्यातून या संघटनेची स्थापना करण्याची संकल्पना आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: ब्रिक्सचे (BRICS) कोणतेही एक कायमस्वरूपी मुख्यालय नाही. BRICS ची मुख्य वित्तीय संस्था असणाऱ्या 'न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (New Development Bank)' कायमस्वरूपी मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.