नुकतेच केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्यामार्फत भूजल पुनर्भरण क्षेत्रे ओळखण्यासाठी ‘पुनः भरण (Punah Bharan)' ॲपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्यामार्फत संपूर्ण भारतात भूजल पुनर्भरण (Groundwater recharge) नियोजनाला वैज्ञानिक आधार देण्यासाठी तसेच भूजलाचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी ‘पुनः भरण (Punah Bharan)' नावाच्या मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे.
- हे ॲप्लिकेशन जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग' च्या ‘राष्ट्रीय जल मिशन’ सोबत मिळून ‘भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स’ द्वारे विकसित करण्यात आले आहे.