नुकताच ब्रिटीश लेखक एम. जॉन हॅरिसन यांनी ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग (The End of Everything)' या कादंबरीसाठी २०२६ चा बुकर पुरस्कार (Booker Prize) जिंकला आहे.
ठळक मुद्दे:
- ब्रिटीश लेखक एम. जॉन हॅरिसन यांनी त्यांच्या ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ या कादंबरीसाठी २०२६ सालचा बुकर पुरस्कार पटकावला आहे.
- ही त्यांची १३ वी कादंबरी होती.
- १९६९ मध्ये या प्रतिष्ठित पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून विज्ञान कथा तसेच काल्पनिक साहित्यावर प्रामुख्याने लिहिणारे ते पहिले लेखक ठरले आहेत.
- २०२५ चे विजेते डेव्हिड झॅले यांच्या हस्ते त्यांना हा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- यासोबतच ८१ व्या वर्षी बुकर पुरस्कार जिंकणारे ते सर्वात वयोवृद्ध लेखक ठरले आहेत.