भारतीय वंशाची बोधना शिवनंदन ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२६ मध्ये सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर (Woman Grandmaster)' बनली आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय वंशाची ब्रिटीश बुद्धिबळपटू बोधना शिवनंदन हिने उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या ४६ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले.
  • तिने वयाच्या ११ व्या वर्षी इतिहासातील सर्वात तरुण 'वुमन ग्रँडमास्टर' बनण्याचा बहुमान मिळविला आहे. 
  • बोधनाने आपले तिसरे आणि वुमन ग्रँडमास्टरसाठी अंतिम 'नॉर्म (Norm)' अर्थात आवश्यक कामगिरीचा निकष पूर्ण करत कॅटेरिना लॅग्नोचा २००२ मधील १२ वर्षे ४ महिन्यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
  • इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वयाच्या ९ व्या वर्षी प्रतिनिधित्व करणारी ती सर्वात तरुण खेळाडू तसेच ग्रँडमास्टरला पराभूत करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे.
  • आपल्या या विशेष कामगिरीद्वारे तिने कॅरिसा यिप आणि ज्युडिट पोलगर यांचे पूर्वीचे विक्रम मोडीत काढले आहेत.