भारतीय वंशाची ११ वर्षीय ब्रिटीश बुद्धिबळपटू बोधना शिवनंदन नुकतीच 'बुद्धिबळातील सर्वात तरुण महिला आंतरराष्ट्रीय मास्टर (Youngest Female International Master in Chess)' बनली आहे.
ठळक मुद्दे:
- माँटेनेग्रो येथे आयोजित 'युरोपियन क्लब कप' स्पर्धेत ११ वर्षांची बोधना शिवनंदन सर्वात तरुण महिला 'इंटरनॅशनल मास्टर' ठरली आहे.
- सदर स्पर्धेत आपला शेवटचा 'इंटरनॅशनल मास्टर' पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर तिने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
- 'युरोपियन क्लब कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वीडनच्या व्हिक्टोरिया जोहानसन हिचा पराभव करून तिने आपला शेवटचा 'इंटरनॅशनल मास्टर' निकष पूर्ण केला आहे.
- 'इंटरनॅशनल मास्टर' होण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करणारी बोधना शिवनंदन ही सर्व वयोगटांतील सातवी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.