प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रमासाठी बिस्लेरी इंटरनॅशनमार्फत (Bisleri International) भारतीय स्टेट बँकेसोबत (State Bank of India - SBI) भागीदारी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- 'बॉटल्स फॉर चेंज (Bottles for Change)' या उपक्रमांतर्गत बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत भागीदारी केली आहे.
- जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
- वापरलेल्या प्लास्टिकचे सुयोग्य वर्गीकरण, संकलन आणि पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देणे तसेच भारताच्या चक्रीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीस पाठिंबा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपक्रम - मुख्य वैशिष्ट्ये:
- विविध कार्यालयांमधील SBI कर्मचाऱ्यांसाठी बिस्लेरीमार्फत प्लास्टिक वर्गीकरण, संकलन आणि पुनर्वापर यांबाबत प्रशिक्षण व जनजागृती सत्रे आयोजित करण्यात येतील.
- जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी विविध संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आणि समुदायांना सहभागी करून घेण्यावर 'बॉटल्स फॉर चेंज' हा उपक्रम भर देतो.
- भारताच्या चक्रीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीस ही भागीदारी प्रेरणादायी ठरेल आणि २०७० पर्यंत 'नेट झिरो' (Net Zero) उत्सर्जन गाठण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत होईल यात शंकाच नाही.
'बिस्लेरी'बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: १९६५ मध्ये मुंबई येथे बिस्लेरीची सुरुवात झाली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: बिस्लेरी मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
- वैशिष्ट्य: इटालियन उद्योजक सिग्नोर फेलिस बिस्लेरी यांच्याकडून १९६९ मध्ये पार्ले ग्रुपने ती विकत घेतली.
- सध्याचे कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी: डॉ. अँजेलो जॉर्ज हे सध्या कार्यरत बिस्लेरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.