केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली येथे 'वाघ अधिवास क्षेत्रांवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे (International Workshop On Tiger Landscapes)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले आहे.
  • सदर कार्यशाळा ही 'वाघ अधिवास क्षेत्रे: उपजीविका आणि उत्पन्न निर्मितीचे आधारस्तंभ म्हणून संवर्धन, जैव-अर्थव्यवस्था आणि पर्यावरण-पर्यटन (Tiger Landscapes: Conservation, Bioeconomy and Ecotourism as Pillars for Livelihood and Income Generation)' या संकल्पनेवर आधारित होती.
  • 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' द्वारे 'आशियाई विकास बँक' आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रायांतर्गत असलेल्या 'राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण' यांच्या सहकार्याने संयुक्तपणे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

'वाघ अधिवास क्षेत्रां'वरील कार्यशाळेबाबत इतर बाबी:

  • अधिवास-स्तरीय संवर्धन, प्रादेशिक सहकार्य आणि शाश्वत विकास यांवर लक्ष केंद्रित करणे तसेच परिसंस्था सेवा, हवामान लवचिकता आणि निसर्ग-आधारित उपाययोजना यांबाबत चर्चा या मुख्य उद्देशांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यशाळेत बांगलादेश, भूतान, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ आणि व्हिएतनाम येथील सरकारी प्रतिनिधी व तज्ज्ञ यांनी आपला प्रमुख सहभाग दर्शविला.

IBCA बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): IBCA म्हणजेच International Big Cat Alliance अर्थात आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स होय.
  • स्थापना वर्ष: IBCA ही २०२३ मध्ये भारताच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संस्था आहे.
  • मुख्य उद्दिष्ट: वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्युमा या ७ मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.