नुकतेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर (Légion d’honneur)' देऊन सन्मानित केले आहे.
ठळक मुद्दे:
- हा सर्वोच्च सन्मान भारत-फ्रान्स आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यातील त्यांचे योगदान तसेच दूरसंचार व डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेण्याचे महत्वपूर्ण कार्य करतो.
सुनील भारती मित्तल यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ते एक सुप्रसिद्ध भारतीय उद्योजक असून 'भारती एंटरप्रायझेस'चे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
- दूरसंचार, डिजिटल पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा, आदरातिथ्य, रिअल इस्टेट तसेच उपग्रह दळणवळण यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत असणारा हा एक वैविध्यपूर्ण व्यावसायिक समूह आहे.
- ते पॅरिसस्थित उपग्रह दळणवळण कंपनी 'युटेलसॅट'चे सह-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
प्राप्त पुरस्कार:
- पद्मभूषण पुरस्कार (२००७) - व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल
- 'ऑनररी नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'(२०२४) - किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून हा किताब मिळवणारे ते पहिले भारतीय नागरिक