बलदेव पुरुषार्थ यांची नुकतीच आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून ३ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

 ठळक मुद्दे:

  • ते पंजाब केडरचे २००२ च्या तुकडीतील आयएएस (IAS) अधिकारी आहेत.
  • सध्या आर्थिक व्यवहार विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

ADB बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ADB म्हणजेच आशियाई विकास बँक (Asian Development Bank) होय.
  • स्थापना वर्ष: १९ डिसेंबर १९६६ रोजी ADB ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मांडालुयाँग (मेट्रो मनिला), फिलिपिन्स येथे ADB चे मुख्याल स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या ADB चे ६९ सदस्य देश आहेत.
  • कार्यरत अध्यक्ष: सध्या मासाटो कांडा हे ADB च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.