नुकतीच नोएल  एन. टाटा यांच्यानंतर बहराम वकील यांची 'टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (Tata Investment Corporation Limited)' नूतन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • टाटा ग्रुपची गुंतवणूक कंपनी असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत बहराम एन. वकील यांची नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • ते अध्यक्ष आणि संचालक पदावरून निवृत्त होणाऱ्या नोएल एन. टाटा यांची जागा घेतील.

बहराम वकील यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • ते एक प्रख्यात कॉर्पोरेट वकील तसेच 'एझेडबी अँड पार्टनर्स' या भारतीय लॉ फर्मचे सह-संस्थापक आहेत.
  • ते कॉर्पोरेट पुनर्रचना, दिवाळखोरी, नादारी, पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प वित्तपुरवठा यांमध्ये विशेषज्ञ आहेत.
  • मार्च २०२५ मध्ये ते स्वतंत्र संचालक म्हणून टीआयसीएलच्या (TICL) संचालक मंडळात सामील झाले.