नुकतेच BHASHINI-IISc बंगळूरुमार्फत ‘सौराष्ट्र (Sourashtra)’ भाषेसाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित टेक्स्ट-टू-स्पीच मॉडेल (AI-Based Text-to-Speech Models)' विकसित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डिजिटल भारतासाठी 'भाषा' इंटरफेस (Bhasha Interface for India) विभागामार्फत कर्नाटकच्या बंगळूरु येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (Indian Institute of Science - IISc) सहकार्याने सौराष्ट्र भाषेकरिता टेक्स्ट-टू-स्पीच (TTS) मॉडेल विकसित करण्यात आले आहे.
- कमी संसाधने असलेल्या भारतीय भाषांसाठी डिजिटल समावेश मजबूत करण्याकरिता हा पुढाकार घेण्यात आला आहे.
- 'सौराष्ट्र' ही एक डिजिटलदृष्ट्या अल्प-प्रतिनिधित्व असलेली अल्पसंख्याक इंडो-आर्यन भाषा आहे.
- ही भाषा प्रामुख्याने तामिळनाडूमधील सौराष्ट्र समुदायाद्वारे बोलली जाते.