दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी 'जागतिक आदिवासी दिन (International Day of the World’s Indigenous Peoples)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी समुदायांचे योगदान, संस्कृती आणि परंपरा यांना मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक आदिवासी दिन (International Day of the World’s Indigenous Peoples)' साजरा करण्यात येतो.
- 'आदिवासी सुईणींचा सन्मान: जीवन आणि आरोग्याचे रक्षण (Honoring Indigenous Midwives: Safeguarding Life and Well-being)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
- १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव स्वीकारत ९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून घोषित केला.
- ९ ऑगस्ट १९९५ रोजी पहिला 'जागतिक आदिवासी दिन' साजरा करण्यात आला होता.