दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी 'हिरोशिमा दिन (Hiroshima Day)' पाळला जातो.
ठळक मुद्दे:
- दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान (१९४५ मध्ये) अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरात 'हिरोशिमा दिन' पाळला जातो.
- यंदाचे २०२६ हे वर्ष हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्याच्या दुःखद घटनेचा ८१ वा वर्धापनदिन आहे.
हिरोशिमा दिनाची पार्श्वभूमी:
- दिवस पाळण्यास कारण आणि सुरुवात: ६ ऑगस्ट १९४७ रोजी मुख्यत्वे शांततेचा प्रसार करण्यासाठी आणि अणुबॉम्ब हल्ल्यातील बळींचे स्मरण करण्यासाठी 'हिरोशिमा पीस फेस्टिव्हल असोसिएशन (Hiroshima Peace Festival Association)'तर्फे पहिला 'हिरोशिमा दिन शांतता महोत्सव (Hiroshima Day Peace Festival)' आयोजित करण्यात आला होता.
- स्मृती सोहळा स्थळ: जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमधील 'जेनबाकू डोम (Genbaku Dome)' येथे दरवर्षीचा स्मृती सोहळा आयोजित करण्यात येतो.
- 'जेनबाकू डोम' या १९४५ सालच्या हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्यातून सुरक्षित राहिलेल्या एकमेव वास्तूला १९९६ मध्ये युनेस्कोमार्फत 'जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site)' म्हणून घोषित करण्यात आले.