दरवर्षी ११ ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक स्टीलपॅन दिवस' साजरा केला जातो.

ठळक मुद्दे:

  • संयुक्त राष्ट्रांद्वारे (UN) त्रिनिदाद आणि टोबॅगो चे राष्ट्रीय वाद्य असणाऱ्या 'स्टीलपॅन'चे महत्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात दरवर्षी ११ ऑगस्ट रोजी 'जागतिक स्टीलपॅन दिवस (World Steelpan Day)' साजरा केला जातो. 
  • 'स्टीलपॅन'चे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणे तसेच शाश्वत विकासातील त्याचे योगदान नमूद करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 
  • यंदाची २०२६ सालची ही या दिवसाची चौथी आवृत्ती होती.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २०२२ मध्ये, त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकामार्फत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेकडे (UNESCO) जागतिक स्टीलपॅन दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
  • संयुक्त राष्ट्र महासभेतर्फे ठराव स्वीकारत २०२३ मध्ये ११ ऑगस्ट हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक स्टीलपॅन दिवस' म्हणून घोषित करण्यात आला.