दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक सिंह दिन (World Lion Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • सिंहांबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या संवर्धनापुढील आव्हाने अधोरेखित करणे तसेच परिसंस्था व सांस्कृतिक वारशातील त्यांची भूमिका जपण्याच्या प्रयत्नांना चालना देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • १० ऑगस्ट २०२६ रोजी १४ वा 'जागतिक सिंह दिन' साजरा करण्यात आला.

पार्श्वभूमी:

  • अमेरिकेतील फ्लोरिडा येथे स्थित 'बिग कॅट रेस्क्यू' (BCR) या संस्थेने 'जागतिक सिंह दिनाची' सुरुवात २०१३ मध्ये  केली.
  • ही संस्था म्हणजेच सिंह संवर्धनासाठी समर्पित वन्यजीव अभयारण्य आहे.
  • डेरेक आणि बेव्हरली जुबर्ट हे संयुक्तपणे या उपक्रमाचे संस्थापक आहेत.