दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक जैव-इंधन दिन (World Biofuel Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून जैव-इंधनांबाबत जागरूकता निर्माण करणे, पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारतामध्ये मिश्रित जैव-इंधनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी २०१५ पासून 'जागतिक जैव-इंधन दिन' साजरा करत आहे.
- अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल वापरणारा देश आहे. यास्तव जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैव-इंधनाचा अवलंब करणे खूपच महत्वाचे ठरते.
- रुडॉल्फ क्रिस्टिअन कार्ल डिझेल यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
- १० ऑगस्ट १८९३ रोजी जर्मनीतील ऑग्सबर्ग येथे रुडॉल्फ यांनी शेंगदाण्याच्या तेलावर चालणाऱ्या आपल्या डिझेल इंजिनचे प्रात्यक्षिक दर्शविले होते.