ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीमार्फत भारताच्या पहिल्या खाजगी ८०० किलोन्यूटन (kN) FFSC रॉकेट इंजिन ‘एव्हरेस्ट’चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमार्फत (Astrobase Space Technologies pvt. Ltd) कर्नाटकातील बंगळूर येथे ‘एव्हरेस्ट (EVEREST)' या भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित ८०० किलोन्यूटन (kN) फुल-फ्लो स्टेज्ड कम्बशन (Full-Flow Staged Combustion - FFSC) रॉकेट इंजिनचे अनावरण केले.
- हे इंजिन पुनर्वापर करण्यायोग्य मध्यम-उंचीच्या प्रक्षेपण वाहनांसाठी तसेच प्रगत कक्षीय मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे.
एव्हरेस्ट (EVEREST) रॉकेट इंजिनबद्दल थोडक्यात माहिती:
- याचे तंत्रज्ञान उत्तम दर्जाचे आहे ज्यामध्ये उच्च दाब, कार्यक्षमता आणि कमी औष्णिक ताणासाठी पूर्णपणे वायूयुक्त प्रणोदकांसह एफएफएससी (FFSC) तंत्रज्ञानाचा वापर करते, जे सर्वात जटिल इंजिन रचनांपैकी एक आहे.
- ॲस्ट्रोबेसने २०२५-२६ मध्ये उप-प्रमाणातील (सब-स्केल) आणि टर्बोपंप चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
- सुमारे २० इंजिनची योजना निर्धारित आहे आणि २०२६ मध्ये पूर्ण-प्रमाणातील हॉट-फायर चाचणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- ॲस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजीज ही २०२४ मध्ये स्थापना करण्यात आलेली आणि कर्नाटकातील बंगळूर येथे मुख्यालय असलेली ही एक भारतीय डीप-टेक एरोस्पेस स्टार्टअप आहे.
- ॲस्ट्रोबेसचे नेतृत्व सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज खंडेलवाल करतात.