आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिलांच्या कबड्डी अंतिम सामन्यात भारताने इराणचा ३७-३३ असा पराभव करत कबड्डीचे सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- सदर विजयासह भारताने आपले विजेतेपद राखत आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे.
- ऐची प्रांतातील टोकाई येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने इराणविरुद्ध सुवर्णपदक जिंकले.
- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील महिला कबड्डीमधील भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले आहे.