अशोक सेन यांना नुकताच 'ऑस्कर क्लाइन मेडल (Oskar Klein Medal) २०२६' जाहीर करण्यात आला असून हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत.
ठळक मुद्दे:
- 'स्ट्रिंग थिअरी' (string theory), 'ब्लॅक होल एन्ट्रॉपी' (black-hole entropy) आणि 'एस-ड्युअॅलिटी' (S-duality) या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे.
- असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत.
- सध्या अशोक सेन बेंगळुरू येथील 'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक विज्ञान केंद्र (International Center for Theoretical Sciences)' या संस्थेमध्ये 'ICTS-इन्फोसिस माधव चेअर प्रोफेसर (ICTS-Infosys Madhava Chair Professor)' या पदावर कार्यरत आहेत.
'ऑस्कर क्लाइन मेडल'बाबत महत्वपूर्ण माहिती:
- १९८८ सालापासून दिला जाणारा 'ऑस्कर क्लाइन मेडल' हा भौतिकशास्त्रातील एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
- सदर पुरस्कार हा 'स्टॉकहोम युनिव्हर्सिटी' आणि 'रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या नोबेल कमिटी फॉर फिजिक्सद्वारे दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
- स्वीडनचे प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ऑस्कर क्लाइन यांच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात येतो.
- पुरस्कार विजेत्या व्यक्तीला 'ऑस्कर क्लाइन मेमोरियल लेक्चर (Oskar Klein Memorial Lecture)' नावाने एक विशेष व्याख्यानदेखील द्यावे लागते.