महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान (IT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकास आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची नुकतीच 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या (Esports Games Federation - ESGF)' अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'च्या सर्वसाधारण बैठकीत आशिष शेलार यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
- प्रभारी अध्यक्ष नंदन झा आणि मानद अध्यक्ष अशोक ध्यानचंद यांनी त्यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला होता.
आशिष शेलार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती:
- वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ पासून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य - आमदार असून भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.
- क्रीडा प्रशासन या विभागात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
- २०१७ मध्ये 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'चे ( Mumbai Cricket Association - MCA) अध्यक्षपद तसेच क्रिकेट आणि फुटबॉल संघटनांमधील विविध पदांचा यामध्ये समावेश आहे.
ESGF बाबत महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): ESGF म्हणजेच Esports Games Federation अर्थात 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन' होय.
- स्थापना वर्ष: २०२४ मध्ये ESGF ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ESGF चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या नवनिर्वाचित आशिष शेलार हे ESGF च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
- वैशिष्ट्य: भारतातील ई-स्पोर्ट्स आणि बौद्धिक खेळांच्या प्रोत्साहन, नियमन तसेच विकासासाठी समर्पित असलेली हे एक राष्ट्रीय संस्था आहे.