नुकतेच अरिंदम चौधरी यांनी त्यांच्या ‘आफ्रिका बिफोर अमेरिका(Africa Before America)’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
ठळक मुद्दे:
- अरिंदम चौधरी हे व्यवस्थापन विचारवंत, लेखक आणि शिक्षण उद्योजक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
- सदर पुस्तक हे आधुनिक अमेरिकेच्या उदयापूर्वी आफ्रिकेची भूमिका आणि महत्त्व यावर ऐतिहासिक दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करते.
‘आफ्रिका बिफोर अमेरिका’ पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती:
- मुख्यतः आफ्रिकेचा इतिहास, संस्कृती, जागतिक आर्थिक विकास आणि ऐतिहासिक दृष्टिकोन यांसारख्या विषयांचा शोध हे पुस्तक घेते.
- एका विकसित आणि समतावादी जागतिक समाजाबद्दलची त्यांची दूरदृष्टी दर्शविण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून पार पडते.
- जागतिक उत्पन्नातील असमानता कमी करणे, आफ्रिकेतील आर्थिक वाढ आणि मानवी विकासाला चालना देणे तसेच अधिक समान जागतिक व्यवस्था निर्माण करण्यावर या पुस्तकामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अरिंदम चौधरी यांच्या इतर उल्लेखनीय साहित्यकृती:
- व्हॉट मार्क्स लेफ्ट अनसेड (What Marx Left Unsaid)
- द ग्रेट इंडियन ड्रीम (The Great Indian Dream)
- २०४७: अ रोडमॅप टू बीटिंग द यूएसए अँड चायना (2047: A Roadmap to Beating the USA & China)
- डिस्कव्हर द डायमंड इन यू (Discover the Diamond in You)
- बियॉन्ड गॉड अँड कॅपिटलिझम (Beyond God & Capitalism)
- काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच (Count Your Chickens Before They Hatch)