२०२६ 'आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमधील (Asian Aerobic Gymnastics Championships)' वरिष्ठ महिलांच्या गटात अरिहा पांगमबामने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- सदर १० वी स्पर्धा ही फिलीपिन्सच्या टगायटे (Tagaytay) शहरात ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
- मणिपूरच्या अरिहा पांगमबामने या स्पर्धेत १९.१०० गुणांसह भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.
- थायलंडच्या चान्यापित मनी रौप्यपदकाची, तर जपानची माहिरो किशिबे कांस्यपदकाची मानकरी ठरली.
अरिहा पांगमबामबद्दल थोडक्यात माहिती:
- १९.१०० गुण मिळवत अरिहा पांगमबामने तांत्रिक अचूकता व कलात्मक सादरीकरण या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली.
- यापूर्वी २०२२ आणि २०२४ च्या स्पर्धांमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती.