नुकतेच माजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे ‘द स्टोरी ऑफ वंदे मातरम (The Story of Vande Mataram)' या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळलेल्या डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी नवी दिल्ली येथील 'कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया (Constitutional Club of India)'मध्ये ‘द स्टोरी ऑफ वंदे मातरम (The Story of Vande Mataram)’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे अनावरण केले आहे.
  • सदर पुस्तक मूलतः ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेते रंगा हरी यांनी मल्याळम भाषेत लिहिले होते आणि डॉ. मर्सी जिल यांनी त्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले आहे.
  • या पुस्तकाद्वारे भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम’चे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे योगदान यावर प्रकाश टाकला जातो.
  • बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये लिहिलेल्या आणि नंतर त्यांच्या ‘आनंदमठ (१८८२)' या महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरीत समाविष्ट करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम’च्या उगमस्थानाचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.