नुकतेच नागालँडच्या 'अंग (Angh)' या चित्रपटाला 'टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (Toronto International Film Festival - TIFF)' २०२६ मध्ये 'प्लॅटफॉर्म प्राईझ (Platform Prize)' प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • TIFF २०२६ मध्ये नागालँडमधील 'अंग (Angh)' या तेजा रिओ दिग्दर्शित चित्रपटाने 'प्लॅटफॉर्म प्राईझ (Platform Prize)' जिंकले आहे.
  • ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म (Best International Feature Film)' श्रेणीतील शर्यतीत सहभागी होण्याचा एक नवीन मार्ग कोन्याक (Konyak) भाषेतील या चित्रपटाला खुला झाला आहे.
  • कोन्याक भाषेतील हा चित्रपट TIFF च्या स्पर्धात्मक 'प्लॅटफॉर्म प्रोग्राम'साठी निवडल्या गेलेल्या १२ चित्रपटांपैकी एक आहे.
  • नागा तसेच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

'अंग' आणि 'प्लॅटफॉर्म प्राईझ'बाबत थोडक्यात माहिती:

  • 'अंग'ला 'प्लॅटफॉर्म प्राईझ'ने सन्मानित करण्यात आले असून तो TIFF च्या स्पर्धात्मक 'प्लॅटफॉर्म' विभागातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन तसेच दिग्दर्शकीय दृष्टीकोन असलेल्या चित्रपटांना व्यासपीठ देण्यासाठी 'प्लॅटफॉर्म' विभाग तयार करण्यात आला आहे.
  • सदर पुरस्कारासोबत २०,००० कॅनेडियन डॉलर्सची रोख रक्कम आणि एक ट्रॉफी प्रदान करण्यात येते.
  • पाब्लो ट्रॅपेरो, अम्मा असांते, सिल्व्हिया चांग, ​​ल्यूक डेरी तसेच अल्बर्ट ली यांचा TIFF २०२६ ज्युरी सदस्यांमध्ये समावेश होता.

'अंग' चित्रपटाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • 'अंग' हा १९६० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील ईशान्य भारतातील नागालँड प्रदेशावर आधारित असणारा चित्रपट आहे.
  • सदर चित्रपटाचे चित्रीकरण हे कोन्याक भाषेत करण्यात आले आहे.