आंध्र प्रदेशकडून विशाखापट्टणममध्ये नुकतीच ३१,३८७ कोटी रुपयांच्या 'हरित एआय माहिती केंद्र (Green AI Data Centre)' उभारण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • आंध्र प्रदेश सरकारने या केंद्राला मंजुरी दिल्याने विशाखापट्टणममध्ये मोठ्या तंत्रज्ञान गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • सदर प्रकल्पात ३१,३८७ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असून तो भीमली (भीमुनिपट्टनम) मंडळातील 'अमानम' गावामध्ये प्रस्तावित आहे.
  • या प्रकल्पामुळे सुमारे १,००० लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा राज्य सरकारचा अंदज आहे.
  • मोठ्या तंत्रज्ञान गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या आंध्र प्रदेश सरकारच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे.