नुकतीच 'ऑफिस ऑफ द वर्मा फॅमिली' आणि 'इंटर-गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन फॉर द युज ऑफ मायक्रो-अल्गी स्पिरुलिना अगेन्स्ट मॉलन्युट्रिशन (IIMSAM)' यांनी अंका-मारिया वर्मा यांची भारतासाठी IIMSAM च्या 'राजदूत-विशेष (Ambassador-at-Large)' पदी ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • हा कार्यकाळ २० ऑक्टोबर २०२६ ते १९ ऑक्टोबर २०३१ असा ५ वर्षांचा असणार आहे.
  • सदर नियुक्ती ही IIMSAM चे सरचिटणीस रेमिजिओ मॅराडोना यांच्याद्वारे करण्यात आली आहे.
  • अंका-मारिया वर्मा भारतात मानवतावादी उपक्रम, पोषण कार्यक्रम तसेच विविध भागधारकांशी समन्वय साधण्याचे काम करतील.

अंका-मारिया वर्मा यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

अल्प परिचय:

  • त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९८७ रोजी रोमानियामध्ये झाला होता.
  • त्या एक उद्योजिका, माजी मॉडेल आणि समाजसेविका असून सध्या भारतात वास्तव्यास आहेत.

कॉर्पोरेट नेतृत्व/ भूमिका:

  • अध्यक्ष (Chairperson) म्हणून कार्यरत - जागतिक बहुराष्ट्रीय ब्रँड 'ओलियालिया वर्ल्ड (Olialia World)'
  • नेतृत्व पदे - 'गॅंटन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (GANTON India Private Limited)' आणि 'सिग सॉअर इंडिया (SIG SAUER India)' कंपन्यांमध्ये