नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे अंमली पदार्थ नियंत्रण आणि तस्करी रोखण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी कार्यदल (Anti-Narcotics Task Force - ANTF) परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी कार्यदल प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
- सदर उपक्रम हा 'अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (Narcotics Control Bureau - NCB)' द्वारे आयोजित करण्यात आला होता.
- अमित शाह यांनी सदर कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या दूरदर्शन जाहिरातींचे अनावरण करण्यात आले.
- ANTF परिषद २०२६ ची संकल्पना / थीम (Theme): 'संयुक्त संकल्प, सामायिक जबाबदारी (United Resolve, Shared Responsibility)' ही यंदाच्या या परिषदेची संकल्पना आहे.